कोरोनाचा काळ चालू असताना प्रत्येकाने आपापल्या आयुष्यात खुप चांगल्या सवयी लावून घेतल्या पण प्रश्न असा आहे की खरंच आपल्याला चांगल्या सवयी लावण्यासाठी कोरोना सारख्या महामारीची गरज होती का? खरंतर कोरोना सारखी महामारी काही दिवसांतच नष्ट झाली असती तर प्रत्येक व्यक्तीने हात धुण्याची, मास्क वापरण्याची छोटीशी सवय खुप आधीच लावून घेतली असती तर. खरंतर कोरोना एक बिमारी नाही आहे ते तर फक्त एक कारण आहे आपल्याला चांगल्या सवयी लावण्याच. आणि कदाचित आता तेच कारण आपल सर्वांचं आयुष्य एका अश्या मार्गांवर आणून ठेवत आहे जेथून आपला पुढचा प्रवास सामाजिक आणि मानसिक अंतर ठेवूनच जाणार आहे. तस प्रत्येक व्यक्तीने कोरोना महामारीला हरवण्यासाठी सामाजिक अंतर ठेवायलाच पाहिजे पण मला इथे मानसिक अंतर म्हणण्याची गरज नव्हती पण सध्याच्या परिस्थितीत ज्या व्यक्तीला कोरोना झाला, आणि काही कळानंतर उपचाराने तो बराही झाला तरीही आपला समाज मात्र त्याला आपल्यापासुन लांबच ठेवतो आणि त्यामुळेच एका वेगळीच मानसिकता या आधुनिक समाजात जन्म घेत आहे. कदाचित ही मानसिकता काही व्यक्तीसाठी चांगली असलेही पण याच मानसिकतेमुळे माणसं माणसांपासून दूर व्हायला लागली आहे. कदाचित काही वर्षानंतर हा कोरोना पूर्णपणे नष्टही होऊन जाईल पण याच कोरोनामुळे जी नवी आणि विचित्र मानसिकता जन्म घेत आहे ती कधी नष्ट होईल हे मात्र कोणालाच माहिती नाही.
1 Hits
Gaurav Daware
Mar 18, 2021, 5:20 PM
मानसिक कोरोना
Explore more about health
Enjoyed this article? Stay informed by joining our newsletter!
Related Articles
About Author
You must be logged in to post a comment.